शत्रू शांत होत नाही, तोपर्यंत आक्रमण थांबणार नाही ! – इस्रायल
|
भारत सरकारनेही भारतावर आक्रमण करणार्या पाकमधील जिहाद्यांना इस्रायलप्रमाणे चेतावणी देऊन त्याप्रमाणे धडक कृती करणे अपेक्षित !
तेल अवीव (इस्रायल) – जोपर्यंत शत्रू शांत होत नाही, तोपर्यंत आम्ही आक्रमण थांबवणार नाही. त्यानंतरच शांततेवर चर्चा केली जाईल, अशा शब्दांत इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गॅट्स यांनी पॅलेस्टाईनला चेतावणी दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले, ‘हा केवळ प्रारंभ आहे. आम्ही त्यांना असे मारू की, त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल.’ दुसरीकडे ‘हमास’चे नेते हानिया यांनी म्हटले आहे की, जर इस्रायल युद्ध वाढवू इच्छित असेल, तर आम्हीही ते थांबवणार नाही. आम्ही इस्रायलच्या नागरिकांचे जीवन नरक बनवू.
Israel-Gaza conflict: Netanyahu warns against ‘lynchings’ as clashes between Arabs and Jews rock Israeli cities https://t.co/129hKJ7jI5
— MSN (@MSN) May 13, 2021
१. इस्रायलच्या आक्रमणात हमासचा कमांडर बसीम इस्सा ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच हमासच्या ३ मोठ्या इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. हमासच्या संरक्षणविषयी ठिकाणेही उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या आक्रमणात ६५ हून अधिक जण ठार झाले आहेत. यात १६ मुलांचा समावेश आहे.
२. इस्रायलने लक्ष्य करून उद्ध्वस्त केलेल्या १४ मजली इमारतीमध्ये कही प्रसारमाध्यमांची कार्यालये होती; मात्र इस्रायलचे म्हणणे आहे की, येथे हमासच्या गुप्तचर विभागाचे कार्यालय होते. याच इमारतीमध्ये गोपनीय कारवायांचे नियोजन केले जात होते.
हमासकडे आहेत २० ते ३० सहस्र रॉकेट !
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षात ईराण समर्थक असलेल्या ‘हमास’च्या आतंकवाद्यांकडून गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेटचा अक्षरशः वर्षाव करण्यात येत आहे. इस्रायली सैन्याच्या अंदाजानुसार हमासकडे सध्या २० ते ३० सहस्र रॉकेट आहेत. इमासला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलची लढाऊ विमाने ‘हमास’वर बॉम्बफेक करत आहेत.
इस्रायलकडील अत्याधुनिक ‘आयर्न डोम’ यंत्रणा ठरत आहे वरदान !
हमासची रॉकेट आक्रमणे परतवून लावण्यासाठी इस्रायलकडील अत्याधुनिक ‘आयर्न डोम’ यंत्रणा इस्रायलसाठी सुरक्षाकवच बनली आहे. ‘राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स’ आणि ‘इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज’ या २ इस्रायली आस्थापनांनी अमेरिकेच्या साहाय्याने वर्ष २०११ मध्ये ही अभेद्य सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे. इस्रायलच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे, तोफगोळे आणि छोटे रॉकेट ‘आयर्न डोम’ यंत्रणेच्या साह्याने हवेतल्या हवेतच नष्ट केली जातात. केवळ शहराच्या दिशेने येणार्या क्षेपणास्त्रे नष्ट करण्यासाठीच इस्रायलकडून या यंत्रणेचा वापर केला जातो.