दाबोली विमानतळाची धावपट्टी सप्टेंबरपर्यंत रात्री बंद
मुंबई (पसूका) – दाबोली आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नूतनीकरण चालू असून याचा एक भाग म्हणून ८ मे ते ८ सप्टेंबर २०२१ या ४ मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत रात्री १० ते दुसर्या दिवशी सकाळी ६ या वेळेत विमानतळाची धावपट्टी उड्डाणासाठी बंद राहील. नूतनीकरणाचे काम रात्रीच्या वेळी केल्याने नागरी विमानांच्या दळणवळणावर न्यूनतम् परिणाम होईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.