गोव्यात दिवसभरात ७० रुग्णांचा मृत्यू, तर २ सहस्र ८६५ कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात १२ मे या दिवशी ७० रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ६ सहस्र ९२० चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २ सहस्र ८६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण पुन्हा वाढून ४१.४० टक्के झाले आहे. दिवसभरात २ सहस्र ८४० रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित २१२ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ३२ सहस्र ७९१ झाली आहे.
राज्यातील १२ आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण
राज्यात सर्वाधिक मडगाव येथे कोरोनाबाधित २ सहस्र ८४२ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पणजी १ सहस्र ८७०, कांदोळी १ सहस्र ७३४, फोंडा येथे १ सहस्र ७२६, पर्वरी १ सहस्र ६६८, म्हापसा १ सहस्र ५७९, सांखळी १ सहस्र ४०५, कुठ्ठाळी १ सहस्र ३३९, पेडणे १ सहस्र २९५, चिंबल १ सहस्र २५१, शिवोली १ सहस्र १२७ आणि वास्को १ सहस्र २२, अशी आरोग्यकेंद्रागणिक रुग्णसंख्या आहे. फोंडा केंद्रातील रुग्ण एका दिवसांत अल्प झाल्याने ते दुसर्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोचले आहे.