धर्माचरण केल्याने धर्माची शक्ती मिळून आपले रक्षण होते ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर येथे ‘ऑनलाईन’ शौर्य जागृती व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर १२ मे (वार्ता.) – देव, देश आणि धर्म यांसाठी आपल्यातील आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे. हनुमंतानेही असुरांशी लढतांना भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला होता. ‘युवावर्गच देशात क्रांती घडवू शकतो’, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. आपण धर्माचरण केल्यास धर्माची शक्ती आपल्याला मिळते आणि ती शक्तीच आपले रक्षण करते. आदर्श अशा भारतभूमीवर ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी आपल्यातील शौर्याची जागृती करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. पूजा धुरी यांनी केले. येथे ‘ऑनलाईन’ शौर्य जागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या व्याख्यानाला २२ युवती उपस्थित होत्या. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांचा ‘व्हिडिओ’ही युवतींना दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिवलीला गुब्याड यांनी केले.
विशेषव्याख्यानात सहभागी झालेल्या युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. |
अभिप्राय१. कु. हर्षदा – व्याख्यानातील मार्गदर्शन पुष्कळ लाभदायक होते. आम्हाला मार्गदर्शन ऐकून स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याची ओढ निर्माण झाली आहे. |