कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत कडक दळणवळण बंदीचा निर्णय घेणार !  हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

कोल्हापूर – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दूध विक्री आणि औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय दोन दिवसांत घोषित करणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील मृत्यू दराचा आढावा घेण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांकडून ‘टास्क फोर्स’ कोल्हापूर येथे पाठवण्यात येत आहे. नेमके मृत्यू कशामुळे वाढत आहेत ? याचे परीक्षण विभागाकडून होईल. कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे प्रयत्न चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.’’