परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शामुळे त्यांनी अक्षय्य तृतीयेला संतांना दान केलेल्या वस्तूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे

सण-उत्सव यांविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी महर्षी आणि संत वेळोवेळी नामजपादी उपाय सांगतात. २०.४.२०२० या दिवशी वैदीश्वरन् (तमिळनाडू) येथील ‘अगस्ती जीवनाडी’चे वाचक श्री. कमलकण्णन् यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मकुंडली पाहून पुढील उपाय सांगितला – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी (२६.४.२०२० या दिवशी) त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, तसेच एक पुरुष संत यांना दान द्यावे. एका तबकात भगवे वस्त्र (स्त्री संतांना साडी अन् पुरुष संतांना धोतर-उपरणे), तुळशीची माळ, फळे आणि दक्षिणा ठेवून ते संतांना दान द्यावे. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिन्ही संतांच्या डोक्यावर अक्षता घालून त्यांना आशीर्वाद द्यावा.’ त्यानुसार अक्षय्य तृतीयेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्ते सद्गुरुद्वयींना आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना दान देण्यात आले. ‘अक्षय्य तृतीयेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतांना दान दिलेल्या वस्तूंवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत संतांना दान देण्यासाठीच्या पुढील वस्तूंना परात्पर गुरु डॉक्टरांनी हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वस्तूंची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना दान दिलेल्या वस्तू (साडी, तुळशीची माळ, फळे आणि दक्षिणा)

आ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दान दिलेल्या वस्तू (साडी, तुळशीची माळ, फळे आणि दक्षिणा)

इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना दान दिलेल्या वस्तू (धोतर-उपरणे, तुळशीची माळ, फळे आणि दक्षिणा)

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना दान देण्यासाठीच्या वस्तूंना हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वस्तूंच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : संतांना दान देण्यासाठीच्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना दान देण्यासाठीच्या वस्तूंना हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वस्तूंच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप – चाचणीस्थळाची जागा अपुरी पडल्याने काही घटकांची प्रभावळ २२.५५ मीटरच्या पुढे मोजता आली नाही; त्यामुळे पुढील सारणीत त्या घटकांच्या प्रभावळीच्या पुढे ‘२२.५५ मीटर पेक्षा अधिक’, असे लिहिले आहे.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. अक्षय्य तृतीयाचे महत्त्व : ‘वैशाख शुद्ध तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’ म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.

अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं । तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यैः । तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव ॥

– मदनरत्न

अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान अन् हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना दान देण्यासाठीच्या वस्तूंना हस्तस्पर्श केल्याने त्यांमध्ये (वस्तूंमध्ये) चैतन्य संक्रमित होणे : संतांना दान दिलेल्या वस्तू सात्त्विक असल्याने त्यांमध्ये आरंभीही पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या हस्तस्पर्शाने त्या वस्तूंमध्ये चैतन्य संक्रमित झाल्याने त्यांतील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली.

अक्षय्य तृतीयेला हा वैशिष्ट्यपूर्ण उपाय करणे म्हणजे ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळून त्यांचे महान कार्य पूर्णत्वास जाणार’, असा जणू संकेत मिळत आहे.’

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.५.२०२०)

ई-मेल : mav.research2014@gmail.com