अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या भागावर श्री महाकाली देवीचे चित्र
सामाजिक माध्यमांतून प्रियांका चोप्रा यांच्यावर टीका
हिंदूंकडूनच हिंदूंच्या देवतांचा अवमान होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! केंद्र सरकारने अशा प्रकारचा अवमान करणार्यांच्या विरोधात ईशनिंदा करणारा कायदा बनवणे आवश्यक आहे !
नवी देहली – अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या बाजूला श्री महाकाली देवीचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे. टीका करतांना अनेकांनी ‘असे करतांना तुला लाज वाटली पाहिजे’, ‘किमान धर्माचा अपमान तरी करू नकोस’, ‘फॅशनपासून देवाला दूर ठेव’, अशा शब्दांत त्यांना सुनावले आहे.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |