२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही लस उपलब्ध होणार !

भारत बायोटेकला चाचणी करण्यास मान्यता

नवी देहली – कोरोनावरील लस बनवणार्‍या ‘भारत बायोटेक’ला २ ते १८ वर्ष वयोटातील मुलांवर चाचणी करण्याची मान्यता मिळाल्याने या वयोगटातील मुलांनाही लस उपलब्ध होणार आहे. कोरोना लसीशी संबंधित ‘सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी’ने ११ मे या दिवशी वरील वयोगटातील मुलांसाठी ‘भारत बायोटेक’च्या कोरोना लसीची दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यांतील चाचणी करण्याची शिफारस केली होती. त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली. ही चाचणी देहली आणि पाटलीपुत्र (पाटणा) येथील ‘एम्स’, तसेच नागपूरस्थित ‘मेडिट्रिना चिकित्सा विज्ञान संस्थान’सह अनेक ठिकाणी करण्यात येणार आहे.