इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘आय.जी.एम्.’ रुग्णालयातील आग रोखण्याच्या प्रसंगावधानाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुंबई – इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘आय.जी.एम्.’ रुग्णालयातील आग रोखण्याच्या प्रसंगावधानाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. याचसमवेत रुग्णांच्या परिस्थितीची माहिती घेत त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
‘आय.जी.एम्.’ रुग्णालयातील अतीदक्षात विभागातील यंत्रात आग लागल्याचे लक्षात येताच या ठिकाणचे परीचारक, सुरक्षारक्षक, तसेच आधुनिक वैद्य यांनी तात्काळ हालचाली केल्या. प्रसंगावधान राखून अग्नीशमन उपकरणाचा वापर करून आग रोखण्यात आली. वीज पुरवठा बंद करून, अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. यात रुग्णांचीही पुरेपूर काळजी घेण्यात आल्याने पुढील अप्रिय घटना टाळण्यात यश आले.