कोरोनामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली !

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई – राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रक काढले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून याविषयीची माहिती दिली. या परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २३ मे या दिवशी होणार होत्या. या परीक्षेचे पुढील दिनांक नंतर कळवण्यात येतील. मेे मासाच्या शेवटच्या आठवड्यात होणारी ‘जेईई मेन्स’ची चौथ्या टप्प्यातील परीक्षाही सध्या स्थगित करण्यात आली आहे.