छद्मविज्ञानाच्या विरोधात अंनिसकडून ऑनलाईन व्याख्यानमाला
|
सातारा, १० मे (वार्ता.) – विज्ञानाच्या नावाखाली समाजात आशास्त्रीय प्रकार होत असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केला आहे. यावर ११ ते १४ मे या कालावधीत ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला ठेवण्यात आली आहे. फसव्या विज्ञानाला (स्यूडो सायन्स) यातून विरोध करण्यात येणार आहे. छद्मविज्ञानावर यात बोलले जाणार आहे.