अध्यात्मप्रसार करणार्या सनातन संस्थेचा ‘सनातन फायनान्सर अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’शी कोणताही संबंध नाही ! – सनातन संस्थेचा खुलासा
म्हापसा, गोवा येथील ‘सनातन फायनान्सर अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’ वर अंमलबजावणी संचालनालयाने (‘एन्फोर्समेंट डायरेक्टरेट’ने) केलेल्या कारवाईनंतर काही पत्रकारांनी ‘या आस्थापनाचा सनातन संस्थेशी काही संबंध आहे का ?’, अशी विचारणा केली आहे. या संदर्भात आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, ‘सनातन फायनान्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’ या आर्थिक अस्थापनातील ‘सनातन’ शब्द सनातन संस्थेशी नामसाधर्म्य दाखवत असला, तरी प्रत्यक्षात ‘सनातन संस्था’ ही आध्यात्मिक (अध्यात्मप्रसार करणारी) संस्था असून तिचा कुठल्याही प्रकारे या आर्थिक अस्थापनाशी संबंध नाही, तसेच सनातनचा एकही साधक या आर्थिक आस्थापनाशी संबंधित नाही.
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.