कोल्हापूर शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्या आधुनिक वैद्यासह दोघांना अटक
कोल्हापूर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे आधुनिक वैद्य प्रणव खैरे यांच्यासह सचिन जोगम आणि प्रकाश गोटे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील आधुनिक वैद्य प्रणव खैरे हा कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन २३ सहस्र रुपयांना विकत असे. प्रणव हा वैद्यकीय शिक्षण घेत असून एका खासगी रुग्णालयात आधुनिक वैद्य म्हणून काम करत आहे. त्याच्याकडून आणखी ३ इंजेक्शने जप्त करण्यात आली आहेत. (यातून व्यावहारिक शिक्षणासह नीतीमत्ता वाढवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते. – संपादक)