देहलीत एकाच रुग्णालयातील ८० कर्मचारी कोरोनाबाधित, तर एका डॉक्टरचा मृत्यू

नवी देहली – येथील सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुमारे ८० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, तर ए.के. रावत या डॉक्टरचा यामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. रावत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.