गेल्या २० दिवसांत अलीगड मुस्लिम विद्यापिठातील १८ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील अलीगड मुस्लिम विद्यापिठामध्ये गेल्या २० दिवसांमध्ये १८ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विद्यापिठाच्या काही माजी प्राध्यापकांचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या कार्यरत असणारे आणि निवृत्त झालेले असे एकूण ४० हून अधिक प्राध्यापक कोरोनाच्या साथीमुळे मरण पावल्याचे सांगितले जात आहे. विद्यापिठाचे मुख्य प्रवक्ते शाफी किडवाई यांनी सांगितले की, येथील परिस्थिती फार चिंताजनक आहे.
२० दिवसात १८ प्राध्यापकांचा करोनामुळे मृत्यू; अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूंचं ICMR ला पत्रhttps://t.co/7BLg848Bca
कुलगुरुंनी इंडियन काऊन्सील ऑफ मेडिकल रिसर्चला लिहिलं पत्र#ICMR #AMU #AligarhMuslimUniversity #Aligarh #CoronavirusIndia #Covid19 #UttarPradesh— LoksattaLive (@LoksattaLive) May 10, 2021
विद्यापिठाच्या नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचे १०० हून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या विद्यापिठातील विषाणू हा वेगळ्या प्रकारचा असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.