कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. याचसमवेत लेखात उल्लेख केलेली रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांची नावे छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक |
चंद्रपूर येथील क्राइस्ट रुग्णालयात धर्मांध भ्रष्टाचारी आधुनिक वैद्यासमवेत ५ जणांना अटक !
संख्येत अल्प असलेले धर्मांध अपप्रकारात मात्र बहुसंख्य आहेत !
चंद्रपूर, १० मे (वार्ता.) – येथील क्राइस्ट रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागाचे प्रभारी आधुनिक वैद्य जावेद सिद्धीकी यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा भ्रष्टाचार करतांना अन्न आणि औषध विभागाने रंगेहात पकडले. २५ सहस्र रुपयांना या इंजेक्शन विकून भ्रष्टाचार करतांना सहभागी २ परिचारिका आणि अन्य २ जण अशा ५ जणांना अटक करण्यात आली.
मृतदेह नातेवाइकांना न दिल्याने पुणे येथील मायमर हॉस्पिटलच्या विरोधात गुन्हा नोंद
देयक न भरल्याने रुग्णालयाकडून अडवणूक !
तळेगाव, (पुणे) १० मे – उपचारांचे देयक भरू न शकल्यामुळे मृतदेह नातेवाइकांना दिला नाही; म्हणून तळेगाव येथील मायमर हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याने दिली आहे. या प्रकरणी सुधीर गणेश लोके यांनी ७ मे या दिवशी तक्रार प्रविष्ट केली होती.
हा प्रकार शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उघडकीस आणला. तसेच ७ मे या दिवशी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रुग्णालयाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. पवार यांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्यावर तो नोंदवण्यात आला. (पोलीसांनी स्वतःहून गुन्हा का नोंदवला नाही ? – संपादक)
खासगी रुग्णालय आणि कोविड सेंटर येथे आलेले कटू अनुभव
नगरसेवकांना भ्रमणभाष केल्यावर खासगी रुग्णालयात रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध होणे, रुग्णाच्या कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यावर त्याचा मृतदेह नातेवाइकांना देणे
एका रुग्णाचा मधुमेह (डायबेटीस) आणि रक्तदाबाचा (ब्लड प्रेशर) त्रास वाढल्याने त्यांना ८ दिवस खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. बरे वाटल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर रात्री पाय दुखायला लागून धाप लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले. तेव्हा व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे खासगी रुग्णालयाने सांगितले. रुग्णाच्या नातेवाइकांनी स्थानिक नगरसेवकांना माहिती दिल्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्या वेळीच रुग्ण व्यक्तीचे निधन झाले आहे, असे वाटत होते.
दुसर्या दिवशी रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी ‘रुग्णाची प्रकृती गंभीर असून सायंकाळी ६ वाजता कोरोनाची चाचणी करायची आहे’, असे सांगितले. यानंतर रुग्णाची चाचणी कुठे आणि कधी केली ? ते सांगितले नाही. या कालावधीत रुग्णाचे निधन झाले होते. कोरोनाच्या चाचणीचा अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला. त्यामुळे रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला, अन्यथा लवकर देण्यात आला नसता.
– एक वाचक
कोविड सेंटरमध्ये रुग्णाकडून कोरोना तपासणीसाठी नुमने घेणे आणि ३ दिवसांनी अल्प प्रमाणात नमुना घेतल्याने रुग्णाला पुन्हा तो देण्यास सांगणे
एका रुग्णाने कोविड सेंटरमध्ये तपासणी केली. त्या वेळी त्याला ‘२ दिवसांनी अहवाल (रिपोर्ट) देतो’, असे सांगितले. प्रत्यक्षात २ दिवसांनी अहवाल घ्यायला गेल्यावर ‘आणखी १ दिवस अहवाल द्यायला लागेल’, असे सांगितले. तिसर्या दिवशी अहवाल घ्यायला गेल्यावर ‘तपासणीसाठी तुमचे नमुने अल्प प्रमाणात घेतले होते. त्यामुळे तपासणी करता आली नाही’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा नमुने द्यायला सांगितले. त्यामुळे संबंधित रुग्णाला ३ दिवसांनी धावपळ करून पुन्हा तपासणी करावी लागली. – एक साधक
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |