खटाव तालुक्यात (जिल्हा सातारा) वाळूची तस्करी केल्याप्रकरणी दोघे कह्यात
वाळूतस्करांना वेळीच आळा घातला असता, तर आज कोरोनासारख्या संकटकाळात अशा गुन्हेगारांनी डोके वर काढले नसते. आता कोरोना संकटाची स्थिती सांभाळून या गुन्हेगारांवर जरब बसवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे !
सातारा – खटाव तालुक्यातील पुसेगाव-जाखणगाव रस्त्यावर खातगुण गावाच्या सीमेमध्ये येरळा नदी वहाते. या नदीतून अवैधपणे वाळू उपसा केल्याप्रकरणी २ जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्याकडून ६ लाख ८८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे. येरळा नदीपात्रातून पुसेगाव ते नेर आणि पुसेगाव ते काटकरवाडी येथे रात्रभर वाळूतस्करांकडून वाळू उपसा चालू असल्याची माहिती पुसेगाव पोलिसांना मिळाली होती.