देशात १ लाख ७० सहस्र रुग्णांना व्हेंटिलेटर्सची, तर ९ लाख रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता ! – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी देहली – सध्या देशात १ लाख ७० सहस्र ८४१ कोरोनाबाधितांना व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे, तर ९ लाख २ सहस्र २९१ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. कोरोनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

देशात १.३४ टक्के कोरोना रुग्ण अतीदक्षता विभागामध्ये उपचार घेत असून ०.३९ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर ३.७० टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. प्रतिदिन ९ सहस्र ४०० मेट्रिक टनहूनही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचसमवेत ऑक्सिजनची आयात, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी, टँकरची उपलब्धता वाढवणे अशा सूत्रांंवर चर्चा करण्यात आली.