मराठा आरक्षणाविषयी भावना तीव्र असल्या, तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नका ! – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील

मुंबई – मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कुणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये. याविषयी पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. पोलीस त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा ताण वाढेल, असे कृत्य करणे योग्य ठरणार नाही. आरक्षणाविषयी भावना कितीही तीव्र असल्या, तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नका, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.