पत्नीचा साधनेला तीव्र विरोध असूनही नेटाने साधना चालू ठेवणार्‍या साधकाने गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेले मनोगत !

‘कलियुग असल्यामुळे बर्‍याच साधकांना घरून, म्हणजे पतीला पत्नीकडून आणि पत्नीला पतीकडून, तसेच लहान मुलांना आई-वडिलांकडून साधनेला विरोध होतो. कल्याण येथील श्री. विजय अंतू बोलके यांना पत्नीचा पुष्कळ विरोध असूनही ते अनेक वर्षे साधना करत आहेत. त्यांची प्रगती होत आहे. ‘त्यांची पुढील प्रगती जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
श्री. विजय बोलके

१. आई-वडील साधनेला पूरक असणे

‘मी वर्ष १९९६ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. त्या वेळी मी १० वीत होतो. त्या वेळी मला घरातून साधनेला विरोध नव्हता. मी रात्री-अपरात्री एकटा सेवा करून ३ – ४ कि.मी. चालत घरी येत होतो. मला कधीही भूता-खेतांची वा वाईट शक्तींची भीती वाटली नाही. ‘मला माझ्या समवेत कोणती तरी चांगली शक्ती (ईश्वर) समवेत आहे’, अशी जाणीव व्हायची. मी आणि माझ्या वडिलांनी सनातनच्या राष्ट्र जागृती सभा आणि अभ्यासवर्ग ऐकले आहेत. बाबांनी गुरुदेवांना जवळून पाहिले आहे.

२. परात्पर गुरु डॉक्टर, त्या वेळी मला पुष्कळ शारीरिक त्रास असल्याने मी सतत आजारी असायचो. मला नेहमी आधुनिक वैद्यांकडे जावे लागायचे.

३. लग्नानंतर पत्नीने सेवेसाठी विरोध करूनही तिला ‘सेवा सोडणार नाही’, असे निक्षून सांगणे

४.१.२००५ या दिवशी माझे लग्न झाले आणि अवघ्या एका आठवड्यातच माझी पत्नी साधनेला विरोध करू लागली. ती म्हणायची, ‘‘साधनेला आणि सेवेला जाऊ नका. मला वेळ द्या.’’ मी साधनेपासून दूर जाऊ शकत नव्हतो. माझे ध्येय ईश्वरप्राप्तीच असल्यामुळे मला साधना आणि साधक यांच्याविना करमत नसे. माझा स्वभाव एकलकोंडा असल्यामुळे माझे अन्य कुणी मित्र नव्हते. मी केवळ साधकांच्या समवेतच मनमोकळेपणाने बोलत असे; म्हणून पत्नीला सांगितले, ‘‘मी एक वेळ तुला सोडेन; पण साधना आणि सेवा सोडणार नाही.’’ तेव्हापासून मला पत्नीकडून अधिकच विरोध चालू झाला.

४. पत्नीने विविध प्रकारचे त्रास देऊनही ‘कार्यालयात काम अधिक आहे’, असे सांगून कामावरून थेट सेवेला जाणे

पत्नी मंगळसूत्र तोडणे, कपाळाचे कुंकू पुसून टाकणे, बांगड्या फोडणे, अशा कृती करून मला त्रास देऊ लागली. मी सेवा करून घरी उशिरा आलो की, ती दार उघडत नसे. मी पुष्कळ वेळा दार ठोठावल्यावर ती अर्ध्या घंट्याने दार उघडायची. कधी कधी ती मला ४ – ५ दिवस जेवणही देत नसे. मी बाहेर काहीतरी खाऊन यायचो. माझी सर्वांसमोर, स्वतःच्या आई-वडिलांसमोर लाज काढत असे. ती मला शिवीगाळही करत असे, तरीही मी साधना आणि सेवा सोडली नाही. मी पत्नीला ‘कार्यालयात काम अधिक आहे’, असे सांगून कामावरून थेट सेवेला जात होतो.

५. यजमानांसमवेत श्री सत्यनारायणाची पूजा करण्यास नकार देणे

एकदा आम्ही गावी गेलो होतो. तेव्हा श्री सत्यनारायणाची पूजा केली होती. त्या वेळी काही कारण नसतांना तिने माझ्याशी भांडण केले आणि ती माझ्या समवेत पूजेला बसली नाही. सर्वांनी तिला समजावले, तरी तिने ऐकले नाही. शेवटी गुरुजींनी सुपारी ठेवायला सांगून पूजा पूर्ण केली.

गुरुदेव, सांगण्यासारखे भरपूर आहे. जेवढे आठवले तेवढेच लिहिले.’

– श्री. विजय अंतू बोलके, कल्याण, ठाणे. (२८.१.२०२०)