गोव्यात दिवसभरात ३ सहस्र ७५१ कोरोनाबाधित, तर ५५ मृत्यू
पणजी – राज्यात ८ मे या दिवशी कोरोनाबाधित ३ सहस्र ७५१ नवीन रुग्ण सापडले आहेत, तर ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांमध्ये एका ८ दिवसांच्या बालिकेचा समावेश आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ८ सहस्र ११५ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण ४६.२२ टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मडगाव येथे २ सहस्र ३२१ आणि त्याखालोखाल पणजी १ सहस्र ९५०, फोंडा १ सहस्र ८१७, कांदोळी १ सहस्र ८१२, म्हापसा १ सहस्र ८०३, पर्वरी १ सहस्र ४५४, सांखळी १ सहस्र ४१६, पेडणे १ सहस्र ३०५, कुठ्ठाळी १ सहस्र २४५, चिंबल १ सहस्र १६८, शिवोली १ सहस्र १०३, वास्को १ सहस्र १७, कासावली ९७५ आणि डिचोली ९४१ अशी आरोग्यकेंद्रागणिक रुग्णसंख्या आहे.