डिसेंबरमध्ये अनिर्बंध पर्यटन खुले केल्याने गोव्यात कोरोनाचा कहर ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
पणजी, ८ मे (वार्ता.) – डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या मासांत अनिर्बंध पर्यटन खुले ठेवल्याने गोव्यात कोरोनाचा कहर माजला. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ७ मेच्या रात्री ‘सी.एन्.एन्’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीकडे बोलतांना हे विधान केले.
तेे पुढे म्हणाले, ‘‘गोवा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या मासांत देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात आले. या पार्श्वभूमीवर मी आरोग्य खात्याला पुढे कधी तरी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार असे सतर्क केले होते. गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी देशात सर्वाधिक म्हणजे ५१ टक्के आहे.’’