ऑक्सिजन वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कृती दलाची स्थापना
नवी देहली – ‘आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’, अशी केंद्र सरकारला चेतावणी देणार्या सर्वोच्च न्यायालयाने देशात ऑक्सिजन सिलिंडरच्या वितरणासाठी आणि आवश्यक औषधांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी एका कृती दलाची (टास्क फोर्सची) स्थापना केली आहे.
SC sets up national task force to assess, recommend need and distribution of oxygen throughout India.https://t.co/YDLRted5J1
— Hindustan Times (@htTweets) May 8, 2021
देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बहुतेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याची परिणामकारकता पहाता न्यायालयाने हा निर्णय घेतला. या कृती दलामध्ये १२ तज्ञ सदस्यांचा समावेश असणार आहे. हे सदस्य देशातील ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियोजनाचे काम करणार आहेत. या दलातील सदस्यांची नावेही घोषित करण्यात आली आहेत.