साधकांच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करणारे परात्पर गुरुदेव !
परात्पर गुरुदेव आहेत, तर आपल्याला कोणत्याच रोगाचे भय नाही. दुर्धर रोगांतही गुरुदेव साधकांच्या समवेत आहेत. साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करणारे एकमेव परात्पर गुरुदेवच आहेत. परात्पर गुरुदेवांचे जेवढे स्मरण करू, तेवढा त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. २४ घंट्यांत १० मिनिटे स्मरण केले, तर आपल्याला केवळ १० मिनिटे आशीर्वाद मिळेल. २४ घंटे स्मरण केले, तर आपल्याला २४ घंटे भूवैकुंठातील श्रीमन्नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होईल.