‘म्युकरमायकॉसिस’मुळे पुणे शहरात बुरशीविरोधी औषधांचा तुटवडा
शासनाने यासंदर्भात त्वरित धोरण ठरवणे आवश्यक आहे !
पुणे – ‘म्युकरमायकॉसिस’मुळे (बुरशीजन्य आजार) शहरात बुरशीविरोधी औषधे आणि इंजेक्शन यांचा तुटवडा भासत आहे; मात्र शासनाकडून अद्याप कोणताही आदेश न आल्याने आम्ही औषधे नियंत्रणात घेऊ शकत नाही, असे अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितले. ‘म्युकरमायकॉसिस’च्या उपचारासाठी शहरात अनेक ठिकाणांहून रुग्ण येत आहेत. त्यामुळे या औषधांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त एस्.व्ही. प्रतापवार यांनी सांगितले.