राज्यात बालरोगतज्ञांचा ‘टास्क फोर्स’ तातडीने सिद्ध करणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राजेश टोपे

मुंबई – लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे, तसेच तिसर्‍या लाटेची देण्यात आलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोगतज्ञांचा ‘टास्क फोर्स’ तातडीने सिद्ध करणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ७ मे या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, ‘‘या ‘टास्क फोर्स’च्या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार करण्याचे काम होईल. बालकांसाठी आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी या माध्यमातून भर दिला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ६ मे या दिवशी राज्यातील बालरोगतज्ञांशी ‘ऑनलाईन’ संवाद साधला.’’