संगमनेर (नगर) येथे धर्मांधांचे पोलिसांवर आक्रमण !
|
|
संगमनेर – येथील दिल्ली नाका परिसरातील तीन बत्ती चौकात संचारबंदी लागू असतांना ६ मे या दिवशी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पोलीस गस्त घालत असतांना धर्मांधांची गर्दी जमली. पोलीस ‘काय झाले ?’, हे पहाण्यासाठी तिथे गेले. त्या वेळी पोलिसांनी ‘जमावबंदी असतांना गर्दी का केली ?’ असे त्यांना विचारले. एवढ्याच कारणावरून धर्मांधांच्या जमावाने पोलिसांवर आक्रमण करून एका पोलिसाला बेदम मारहाण केली. या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत २ पोलीस घायाळ झाले. जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी नाईलाजाने लाठीहल्ला केला. (पोलिसांवर आक्रमण करण्याच्या हेतूनेच धर्मांध गोळा झाले होते, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक) दंगलीसह सरकारी कामात अडथळे आणि सार्वजनिक हानी करणे या संदर्भात पोलिसांनी ६ जणांसह अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत, तसेच संशयितांना अटक करणे चालू केले आहे. (आपत्काळात संकटे वाढवणार्या धर्मांधांना तात्काळ कडक शासन करा ! – संपादक) बहुतांश धर्मांध पसार झाले आहेत.
Watch: Police personnel attacked by mob in Sangamner, vehicles damaged, employees of Zubair hotel bookedhttps://t.co/lN97q5YLYx
— OpIndia.com (@OpIndia_com) May 7, 2021
१. या घटनेची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे. त्यात ‘१०० ते १५० जणांचा जमाव पोलीस कर्मचार्याचा पाठलाग करत आहे आणि तो जिवाच्या आकांताने मागे पहात पुढे पळत आहे’, असे दिसत आहे.
२. धर्मांधांनी मास्कचा वापर केला नव्हता, तसेच सुरक्षित अंतरही ठेवण्यात आले नव्हते. पोलिसांनी धर्मांधांना याचा जाब विचारला असता त्या वेळी पोलीस आणि धर्मांध यांच्यात वादावादी झाली. या वेळी उद्दाम जमावाने थेट पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास चालू केली. काही वेळ जमाव आणि पोलीस समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.
३. धर्मांधांच्या जमावाने पोलिसांसाठी तात्पुरत्या उभ्या केलेल्या चौक्याही (तंबू) उखडून टाकल्या, तसेच पोलिसांच्या आणि खासगी वाहनांची तोडफोड केली. यात वाहनांची मोठी हानी झाली.