मनमोकळ्या स्वभावाची आणि रुग्णाईत साधिकेची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदिका दहातोंडे (वय १५ वर्षे) !
चैत्र कृष्ण पक्ष द्वादशी (८.५.२०२१) या दिवशी कु. वेदिका दहातोंडे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. नंदा नाईक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(‘वर्ष २०१९ मध्ये कु. वेदिका दहातोंडे हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती.’ – संकलक)
कु. वेदिका दहातोंडे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. मनमोकळेपणा
‘मी रुग्णाईत असतांना वेदिका माझ्या साहाय्यासाठी यायची. तिच्यात पुष्कळ मनमोकळेपणा आहे. एखाद्या दिवशी तिला माझी सेवा करायला जमणार नसल्यास ती ‘आज मला जमणार नाही’, असे नम्रपणे सांगायची. ती माझ्यासाठी औषधांच्या गोळ्याही काढून ठेवायची. तिने कधी गोळ्या काढून ठेवल्या नसल्यास ती मला तसे सांगायची.
२. साधिकेची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करणे
अ. वेदिका मला ८ मास जेवण देण्याची सेवा करत होती. तिने माझी सेवा ‘संतांची सेवा करत आहे’, या भावाने केली. तिच्या स्पर्शातून मला पुष्कळ शक्ती मिळायची. ती मला प्रसाधनगृहात घेऊन जातांना जणू ‘ईश्वराने मला धरले आहे’, असे मला जाणवायचे.
आ. ती माझी सेवा मनापासून करायची. त्यामुळे मला तिचा सहवास हवाहवासा वाटायचा.’
– कु. नंदा सदानंद नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२१)