कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्नाटकातील नागक्षेत्र कुक्के सुब्रह्मण्य येथे एक सप्ताह धन्वंतरी होम !
मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण भारतातील प्रसिद्ध नागक्षेत्र कुक्के सुब्रह्मण्य येथे कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच लोककल्याणार्थ विशेष पूजेला प्रारंभ करण्यात आला आहे. ५ मे ते ११ मेपर्यंत एक सप्ताह पूजा, होम-हवन करण्यात येणार आहे. रोग नियंत्रणासाठी धन्वंतरी होम आणि क्रिमीहर सूक्त जपासहीत होम-हवन करण्यात येत आहे.
धन्वंतरी पूजा कशासाठी ?
धन्वंतरी होमाला वेदांमध्ये विशेष महत्त्व असून या पूजेमुळे रोगराई नष्ट होते, अशी श्रद्धा आहे. विविध दुष्कर्मार्ंंमुळे अनेक व्याधींनी ग्रस्त झालेल्या व्यक्तीने धन्वंतरी देवतेची कृपा संपादन केल्यास ती आरोग्य संपन्न होऊन साधना करू शकते. पुढे भवरोगातूनही मुक्त होऊ शकते, अशी श्रद्धा आहे. या पार्श्वभूमीवर क्षेत्रातील पुजारी विशेष पूजा करणार आहेत.