इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद घायाळ
माले (मालदीव) – मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि सध्या संसदेचे अध्यक्ष असलेले महंमद नशीद हे ६ मे या दिवशी त्यांच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात घायाळ झाले. त्यांना उपाचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने घेतले आहे. महंमद नशीद यांनी काही काळापूर्वी भारत दौर्याच्या वेळी मालदीवमध्ये इस्लामिक स्टेटच्या वाढत्या प्रभावाविषयी चिंता व्यक्त केली होती. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी या आक्रमणाच्या अन्वेषणासाठी ऑस्ट्रेलियाचे साहाय्य घेणार असल्याचे घोषित केले आहे. ‘हे आक्रमण नशीद यांच्यावर झाले नसून देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्था यांच्यावर झाले आहे’, असे त्यांनी म्हटले.
Former Maldives president Mohamed Nasheed was injured in a blast outside his home, local media reported.https://t.co/LW7etAcLiX
— Hindustan Times (@htTweets) May 6, 2021