कोरोनावर मात करण्यासाठी चीनमध्ये गायीचे दूध पिण्यासाठी आग्रह !
चीन सरकारकडून ३० पटीने दूध उत्पादन करण्याचे लक्ष्य !
कुठे गायीच्या दुधाचे महत्त्व उमगलेला चीन, तर कुठे गायीचे रक्षण करू न शकणारा भारत !
बीजिंग (चीन) – कोरोनावर जवळपास मात केलेल्या चीनमध्ये आता सरकारकडून नागरिकांना शरिरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी अधिकाधिक गायीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रोटीनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे कोरोनावर मात करता येऊ शकते, असे सांगितले जात आहे. मागील वर्षी कोरोना महामारीच्या वेळी संसदेच्या वार्षिक बैठकीत लोकप्रतिनिधींनी देशातील प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन किमान ३०० ग्राम दूध पिण्याचा कायदा करण्याचा सल्ला दिला होता. सध्या सामाजिक माध्यमांतून दूध पिण्याविषयी लोकांना आवाहन केले जात आहे. चीन सरकारने वर्ष २०२५ पर्यंत देशात ४५० लाख टन दूध उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे आतापर्यंतच्या उत्पादनाच्या ३० पट अधिक आहे.
China’s millennials drink more milk to boost immune system
Read more: https://t.co/84HxosOay7 pic.twitter.com/wB62tiIlqW
— BusinessMirror (@BusinessMirror) July 25, 2020