सातार्यातील १ सहस्र ७९४ रास्त भाव धान्य दुकानदार संपावर !
कोरोनाच्या आपत्काळात संपावर जाणे कितपत योग्य आहे ?
सातारा, ५ मे (वार्ता.) – सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने जिल्ह्यातील १ सहस्र ७९४ दुकानदार संपावर गेले आहेत.
१ मेपासून हा संप चालू झाला असून जिल्ह्यातील १०० टक्के दुकानदार यामध्ये सहभागी झाले आहेत. गतवर्षीपासून दुकानदारांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने दुकानदारांच्या संघटनेच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारसमवेत संघटनेच्या पदाधिकार्यांची बोलणी चालू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालूच रहाणार आहे, अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली आहे.