उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायींसाठी साहाय्य कक्ष स्थापन होणार
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने कोरोना काळात गायींच्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र साहाय्य कक्ष स्थापन करण्याचा आदेश अधिकार्यांना दिला आहे. गोशाळेत गायी आणि अन्य जनावर यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. बेवारसपणे फिरणार्या गायींना गोशाळेत आश्रय देण्याचा निर्णयही घेतला आहे. राज्यात ५ सहस्र २६८ पेक्षा अधिक गोशाळा केंद्रे आहेत. ज्यामध्ये ५ लाख ७३ सहस्र ४१७ गायी आहेत.