रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या तिघांना अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे अटक
अकलूज (जिल्हा सोलापूर) – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या सुग्रीव किर्दकर, अजय जाधव आणि कुमार जाधव यांना अकलूज पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे सर्व ३५ सहस्र रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीचा प्रयत्न करत होते. औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून या सर्वांना अटक करण्यात आली असून या सर्वांना ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.