सातारा येथे ५८ कोरोनाबाधितांचा बळी !
सातारा, ६ (वार्ता.) – कोरोनाच्या पहिल्या लाटेहून दुसर्या लाटेत बाधितांचा आकडा वाढलेला असून कोरोनामुळे मृत्यूदरातही वाढ नोंदली जात आहे. ५ मेच्या रात्री १२ वाजता जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत कोरोनाने ५८ बाधितांचा बळी घेतला आहे.
कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे कैलास स्मशानभूमीवरती अंत्यसंस्काराचा ताण येत असून अंत्यसंस्कारासाठी जागा अल्प पडू लागली आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत २३७६ नागरिकांचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले होते. आतापर्यंत ही संख्या १ लाख १४ सहस्र २४२ वर गेली असून २ सहस्र ७०० नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.