कोरोना रुग्णांची वाढ होणार्या ठिकाणी दळणवळण बंदी करा !
मुंबई उच्च न्यायालयाची मुख्यमंत्र्यांना सूचना !
मुंबई – पुण्यासह ज्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे, अशा ठिकाणी दळणवळण बंदी लागू करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ‘आम्हाला आदेश द्यायला लावू नका’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आहे. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा मुंबई न्यायालय घेत असून सुनावणीच्या दरम्यान ही सूचना करण्यात आली.
‘मुंबईतील कोरोना नियंत्रणाच्या कामाचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले असेल, तर इतर महापालिकांनीही त्यांची कार्यपद्धती स्वीकारली पाहिजे’, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला.