अमरावती येथे क्रिकेट खेळणार्या तरुणांच्या १७ दुचाकी जप्त !
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण
अमरावती – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक नियम घालून दिले आहेत; मात्र येथील दस्तूर नगर, सिंधी कॅम्प येथील समाज मंदिराच्या पटांगणात एकाच वेळी ५० हून अधिक तरुण क्रिकेट खेळत असतांना आढळले. याविषयी माहिती मिळताच राजापेठ पोलीस आणि महापालिका यांचे पथक घटनास्थळी आले. पथक पोचताच क्रिकेट खेळणारे तरुण सैरावैरा धावू लागले. पोलिसांनी तरुणांची १७ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. ५ मेच्या रात्री ही कारवाई करण्यात आली.