पुणे येथील ओंकारसिंग टाक टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई
पुणे, ६ मे – खंडणी देणास नकार दिल्याने तलवार डोक्यात घालून हत्येचा प्रयत्न करणार्या हडपसर येथील ओंकारसिंग टाक टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ मासांत करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ओंकारसिंग टाक याने त्याच्या सहकार्यांच्या साहाय्याने अवैध टोळी सिद्ध करुन हत्येचा प्रयत्न, जबर दुखापत करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा टाकणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारची कृत्ये केली आहेत.