कोरोनाचा संसर्ग झाल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू रुग्णालयात भरती
जोधपूर (राजस्थान) – येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याच्या माहितीनंतर येथे मोठ्या संख्येने त्यांचे भक्त गोळा झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.