कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत विनामास्क फिरणार्‍यांकडून २१ लाख रुपयांचा दंड वसूल !

कोरोनाच्या वाढीस नागरिकांची बेफिकीर वृत्तीच कारणीभूत !

ठाणे, ६ मे (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत विनामास्क फिरणार्‍या ४ सहस्र ३४२ जणांवर एप्रिल मासात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २१ लाख ७१ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये येथे कोरोनाचे ४१ सहस्र ५५१ नवे रुग्ण आढळले होते.