प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमार याच्यावर हत्येचा आरोप
नवी देहली – ऑलंपिकमध्ये पदक मिळवणारा भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार हा हत्येच्या प्रकरणी पसार झाल्याने देहली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुशील कुमार याच्या घरावर धाडही टाकली होती.
Wrestler murder case: Police looking for olympian Sushil Kumar as accused. What we know so farhttps://t.co/BiguxYFjuV
— OpIndia.com (@OpIndia_com) May 6, 2021
देहलीच्या छत्रसाल स्टेडियमवर ४ मे या दिवशी कुस्तीपटूंच्या दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यामध्ये २३ वर्षांचा कुस्तीपटू सागर कुमार याचा मृत्यू झाला. या हत्येत सुशील कुमार याचाही सहभाग असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी प्रिंस दलाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.