सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी
मुंबई – कोविशिल्ड लसीची निर्मिती करणार्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Amid reports of threats against Adar Poonawalla, a criminal petition was filed before the Bombay High Court on Wednesday seeking Z-plus category security for the Serum Institute of India CEO and his family members.https://t.co/BBeb4PZ2Lf
— News18.com (@news18dotcom) May 6, 2021
मुंबई उच्च न्यायालयामध्ये अधिवक्ता दत्ता माने यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. पूनावाला यांना लस पुरवठ्यावरून धमकी देणार्यांविरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणीही अधिवक्ता माने यांनी केली आहे.