कोरोनाबाधित तरुणीशी अश्लील वर्तन करणार्या २ वॉड बॉयची नोकरीवरून हकालपट्टी
कोरोना संकटाच्या काळात अशा प्रकारची कृती करणार्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील संयोगिता गंज पोलीस ठाण्याच्या सीमेत असणार्या एका रुग्णालयात कोरोनाबाधित तरुणीला भरती करण्यात आले होते. रात्री उशिरा दोन वॉर्ड बॉय तिच्या खोलीत स्वच्छतेसाठी गेले होते. या वेळी ही तरुणी खोलीत एकटीच असल्याचे पाहून या दोघांनी तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी तिला विवस्त्र करण्याचाही प्रयत्न केला. या वेळी तरुणीने आरडाओरड केल्यावर दोघेही पळून गेले. या तरुणीची स्थिती चांगली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केलेली नाही; मात्र रुग्णालय व्यवस्थापनाने या दोन्ही वॉर्ड बॉयना नोकरीवरून काढून टाकले आहे.