एकही खाट रिकामी नसतांना आता ३ सहस्र २१० खाटा एका दिवसात रिकामी !
भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी रुग्णालयांतील खाटांतील घोटाळा उघड केल्याचा परिणाम !
‘इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असतांना प्रशासन काय करत होते?’ असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत असणार ! सरकारने आता याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी !
बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी शहरातील रुग्णालयांमधील खाटा मिळण्यासाठी लाच घेण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर आता रुग्णालयांत ३ सहस्र २१० खाटा रिकामी असल्याचे या संदर्भातील संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे. कालपर्यंत एकही खाट रिकामी नसल्याचे या संकेतस्थळावर दाखवण्यात येत होते. यावरूनच खाटांच्या उपलब्धतेत घोटाळा करण्यात येत होता, हे उघड झाले आहे. खासदार सूर्या यांनी पालिकेच्या कोविड वॉर रूममध्ये मुसलमानांना मोठ्या संख्येने भरती करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सत्य समोर येताच कंत्राटदाराच्या १७ कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले आहे.
#BBMPScam: Tejasvi Surya unearths fraud for hospital beds; earns claps and criticismhttps://t.co/xQ7kXnfNQp#tejasvisurya #BBMPBedScam #BBMP
— Free Press Journal (@fpjindia) May 5, 2021
१. सरकारी कोट्यातील १२ सहस्र ७३६ खाटांपैकी अतीदक्षता विभागातील, तसेच व्हेंटिलेटर असलेले काही बोटावर मोजण्याइतक्याच खाटा शिल्लक असल्याचे दाखवत असलेले सेंट्रल हॉस्पिलच्या बेड मॅनेजमेंटचे संकेतस्थळ आता ३ सहस्र २१० खाटा रिकाम्या असल्याचे दाखवत आहे.
२. यांपैकी सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात १२, सरकारी रुग्णालयात ६७, खासगी मेडिकल कॉलेजमध्ये १ सहस्र १९७, खासगी रुग्णालयात ४०२ असे एकूण १ सहस्र ६९३ खाटा रिकामी आहेत. एवढेच नव्हे, तर ऑक्सिजनची उपलब्धता असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १ सहस्र ५१७ खाटा रिकामी आहेत. १२७ खासगी रुग्णालयात सरकारी कोटा असलेल्या २९ अतीदक्षता विभागात, तर १३ व्हेंटिलेटर खाटा रिकामी आहेत.
खाटांच्या घोटाळ्यामागे मुसलमान संघटना असल्याचा संशय ! – मंत्री ईश्वरप्पा
खाटांच्या घोटाळ्यामध्ये अधिकतर मुसलमान समाजातील लोकच आहेत, असा दावा राज्याचे मंत्री ईश्वरप्पा यांनी शिवमोग्गा येथे केला. ते म्हणाले की, राज्यात आम्ही जिवाचा आटापिटा करून कोविडच्या विरोधात लढत आहोत; परंतु शासनाला वाईट ठरवण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्न करत आहेत. या मागे कोण आहेत, हे अन्वेषणानंतर उघड होईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.