सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि पंढरपूर येथे मराठा समाजाचे आंदोलन !
सोलापूर – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि पंढरपूर येथे मराठा समाज बांधवांनी आंदोलन केले. सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याच्या सिद्धतेत असणार्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकार आणि न्यायालय यांच्या विरोधात घोषणा दिल्या. शहरात विविध ठिकाणी आंदोलनाच्या शक्यतेने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी अर्धनग्न होऊन मुंडण करून आंदोलन केले. सरकार आरक्षणाच्या बाजूने अल्प पडल्याचा आरोप पंढरपूर येथील समाज बांधवांनी केला आहे.