नागपूर येथे विविध मागण्यांसाठी ३५० प्रशिक्षणार्थी आधुनिक वैद्य बेमुदत संपावर !
आधुनिक वैद्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल !
गेल्या १ वर्षापासून कोरोनाच्या संकटकाळात स्वार्थ सोडून अनेक आधुनिक वैद्य कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत; मात्र नागपूर येथे आधुनिक वैद्य स्वार्थासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी असे न करता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यावर भर देणे, हेच त्यांचे कर्तव्य आहे.
नागपूर – मुंबई, पुणेच्या धर्तीवर मानधनात वाढ करावी, विमा कवचासह इतर मागण्यांसाठी ४ मेपासून मेडिकल आणि मेयो महाविद्यालयातील ३५० प्रशिक्षणार्थी आधुनिक वैद्य ‘बेमुदत संपा’वर गेल्याने येथील रुग्णसेवा विस्कळीत झाली असून रुग्णांचे हाल होत आहेत. आंदोलनामुळे मेडिकलच्या कोविड रुग्णालयातील आकस्मिक विभाग बंद करत तो औषधशास्त्र विभागाच्या आकस्मिक विभागात वर्ग करण्यात आला. या धक्कादायक निर्णयाने गैरकोरोनाच्या रुग्णांना विषाणूचा संसर्ग झाल्यास उत्तरदायी कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी अधिष्ठाता कार्यालय परिसरात एकत्र होऊन शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.