रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू !
पनवेल – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे कार्यवाही करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लसीकरणासाठी येणार्या व्यक्ती, तसेच अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांनाच तेथे प्रवेश करण्यास अनुमती असणार आहे.