कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या नेरूळ औद्योगिक वसाहतीतील आस्थापनांवर दंडात्मक कारवाई !
नवी मुंबई, ५ मे (वार्ता. ) – कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या शिवाजीनगर औद्योगिक भागातील (नेरूळ) ३ आस्थापनांवर नेरूळ विभागाचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ६४ सहस्र इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
एका आस्थापनात ३५ हून अधिक व्यक्ती समूहाने आढळून आल्या. एका आस्थापनाच्या कार्यालयात ८ कर्मचारी विनामास्क आढळले. पंखे उत्पादन करणार्या आस्थापनामध्ये त्यांच्या क्षमतेच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक १८५ कर्मचारी आढळून आले. त्यामुळे संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.