पालघरवासियांवर आता रेल्वेमध्ये कोरोनाचे उपचार होणार !
मुंबई – रेल्वेच्या विशेष विलगीकरण डब्यांमध्ये पालघरवासियांवर कोरोना संदर्भात उपचार करण्यात येणार आहेत. विलगीकरण डब्यांची रेल्वे पालघरमध्ये आली असून गाडीत ३७० कोरोनाबाधितांवर उपचार करणे शक्य होणार आहे. पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वृद्धी होत असल्याने आरोग्य सुविधा अपुर्या पडत आहेत. विलगीकरण खाटांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. २३ डब्यांची ही विना वातानुकूलित रेल्वे आहे. एका डब्यात १६ रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून तेथे ऑक्सिजन बेडही उपलब्ध आहेत.