बिहारमध्येही दळणवळण बंदी घोषित !

नवी देहली – देशात कोरोनाचा वाढता कहर पहाता सर्वोच्च न्यायालयाने आणि कोविड टास्ट फोर्सने देशात राष्ट्रीय दळणवळण बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता बिहारमध्ये दळणवळण बंदी घोषित करण्यात आली. यापूर्वी उत्तरप्रदेश, हरियाणा, देहली, राजस्थान, झारखंड, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे.

देशातील ६७.५ टक्के लोकांची दळणवळण बंदीची मागणी !

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंजिया ट्रेडर्स’ने (‘कॅट’ने) एक सर्वेक्षण केले आहे. यात ६७.५ टक्के नागरिकांनी गेल्यावर्षीप्रमाणेच आताही देशात दळणवळण बंदी लावण्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. देशात कोरोनामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे ७८.२ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे.